पन्हाळा ते पावनखिंड – पन्हाळ्याच्या बुरुजावर उभा होते तेव्हा मनात एकच विचार होता – "याच वाटेने कधी महाराज सुटले असतील, आणि याच वाटेवरून बाजीप्रभूंनी मृत्यूशी दोन हात केला असेल."डोंगरावर पाऊस जोरात बरसत होता. ढग इतके खाली आले होते की समोर दिसेनाशी झाले.
-
पन्हाळा ते पावनखिंड – पन्हाळ्याच्या बुरुजावर उभा होते तेव्हा मनात एकच विचार होता – "याच वाटेने कधी महाराज सुटले असतील, आणि याच वाटेवरून बाजीप्रभूंनी मृत्यूशी दोन हात केला असेल."डोंगरावर पाऊस जोरात बरसत होता. ढग इतके खाली आले होते की समोर दिसेनाशी झाले. रानावनातून येणारे आवाज – कधी पक्ष्यांचा, कधी प्राण्यांचा – मनात थोडी भीती तर थोडा उत्साह निर्माण करत होते. पायाखालची वाट घसरट, पण प्रत्येक पाऊल चालताना इतिहासाची आठवण मनात जागी होत होती.ओढे पार करताना कपडे भिजले, चिखलाने बूट भरले, पण त्यातच खरी मजा होती. कधी दमून थांबलो, तर डोळे मिटताच डोक्यात एकच चित्र येत होतं – बाजीप्रभू, तलवार हातात घेऊन, हजारो शत्रूंना रोखून धरताना.जशी पावनखिंड जवळ येत गेली, तसतसा आवाज जणू मोठा होत गेला – "जय भवानी! जय शिवाजी!" तो प्रतिध्वनी खराखुरा होता की माझ्या मनात घुमत होता हे समजत नव्हतं.खिंडीपाशी पोहोचलो, आणि ज्या भूमीत रक्त सांडलं, जिथे हजारो मावळ्यांनी प्राण दिले, तिथे उभं राहिल्यावर हृदय थरारलं. स्मारकासमोर हात जोडले आणि डोळ्यांतून पावसासारख्याच अश्रूंची धार ओघळली.त्या क्षणी जाणवलं – हा ट्रेक फक्त प्रवास नाही, तर शौर्य, बलिदान आणि स्वराज्याशी कलेली थेट भेट आहे