दुर्ग भटकंतीचा या आठवड्यात झालेला दोन दिवसीय ट्रेक:
लोणावळा-ठाकुरवाडी-कोंडेश्वर मंदिर (जांभवली) -धनगरवाडी -कुसूर-मेटलवाडी (मुक्काम)- सावळ्या-पदरातून पधरवाडी- भीमाशंकर- गणेशघाट-घोगोळ घाट-खांडस
सहभागी सदस्य: १२
कालावधी आणि अंतर: २ दिवस (६० किलोमीटर)
ट्रेक
-
दुर्ग भटकंतीचा या आठवड्यात झालेला दोन दिवसीय ट्रेक:
लोणावळा-ठाकुरवाडी-कोंडेश्वर मंदिर (जांभवली) -धनगरवाडी -कुसूर-मेटलवाडी (मुक्काम)- सावळ्या-पदरातून पधरवाडी- भीमाशंकर- गणेशघाट-घोगोळ घाट-खांडससहभागी सदस्य: १२
कालावधी आणि अंतर: २ दिवस (६० किलोमीटर)
ट्रेकचा खर्च: 800 प्रति व्यक्ती (ट्रान्सपोर्ट, फ़ूड, स्टे…)दुर्गचा भटकंतीचा हा ट्रेक म्हणजे सह्याद्रीतील जादूमई दुनियेचा सफर होता, इथे पाहिलाय ढग डोंगराशी वार्ता करताना, बेधुंद पणे कोसळणार्या पांढऱ्या शुभ्र धबधब्याना ओढ्यांना, जागोजागी स्वतःचे अस्तित्व दाखवून देणाऱ्या काही प्राण्याच्या पाऊल खुणाना, पक्षांच्या किलबिलाटांना आणि या निसर्गरुपी स्वर्गात राहणाऱ्या काही अवलियांना!!
सर्व गुण संपन्न अश्या वनसंपदेतून दोन दिवसांची तंगडतोड म्हणजे एका हडाच्या ट्रेकर साठी ही पर्वणीच आहे. नजर जाईपर्यंत सह्याद्रीने भंडारा उधळला होता तो सोनकीच्या फुलांचा. संपन्न आणि मंत्रमुग्ध करणारी वनसंपदा आणि प्राणीसंपदा पाहून पुन्हा एकदा थक्क झालोय या सह्याद्रीत!!