ब्रह्मगिरीत दुर्दैवी घटना : आंध्र प्रदेशच्या भाविकाचा 300 फूट खोल दरीत मृत्यू
-
नाशिक, त्र्यंबकेश्वर – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाला आलेल्या ७३ वर्षीय भाविकाचा ब्रह्मगिरी पर्वतावर दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आंध्र प्रदेशातील मैतर रामराव भैरवी हे मंदिर दर्शनानंतर ब्रह्मगिरीकडे गेले होते. वाट चुकल्याने ते चुकून दुर्गभंडार किल्ल्याच्या दिशेने निघाले आणि अवघड मार्गात अडकून पडले.
सायंकाळी स्थानिकांना मदतीसाठी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. पोलिस व बचाव पथकाने शोध घेतला असता त्यांचा मृतदेह गोरक्षनाथ गुहेजवळ सुमारे ३०० फूट खोल दरीत आढळून आला. प्राथमिक तपासात पाय घसरल्याने हा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
🔴 सावधानता संदेश : सह्याद्री किंवा कोणत्याही डोंगराळ प्रदेशात जाताना स्थानिक मार्गदर्शकांची मदत घ्यावी, अवघड व अपरिचित वाटांवर एकटे जाऊ नये आणि हवामानाचा अंदाज घेऊनच प्रवास करावा. एक छोटीशी चूकही प्राणघातक ठरू शकते.
18 Sept 2025