ताम्हिणी घाट – भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण!
-
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात वसलेला निसर्गरम्य ताम्हिणी घाट यंदाच्या पावसाळ्यात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तब्बल ९,००० मिमीपेक्षा जास्त पाऊस झेलून ताम्हिणीने चेरापुंजी आणि मौसिनराम सारख्या जागतिक पावसाळी गावी स्पर्धा दिली आहे.
चक्रीवादळ संशोधन तज्ज्ञ डॉ. विनीत कुमार म्हणाले – “ताम्हिणी घाटाने ९,००० मिमीचा आकडा पार केला असून, या वर्षी तो भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरला आहे.”
ताम्हिणी घाट फक्त विक्रमी पावसामुळेच खास नाही, तर तो मुळशी धरणाच्या नयनरम्य बॅकवॉटरकडे जाणारा मार्गही आहे. निसर्गसौंदर्य, धबधबे आणि हिरवीगार दरी यामुळे तो पर्यटकांसाठी स्वर्गासमान ठिकाण मानला जातो.
यंदाच्या मुसळधार पावसाने ताम्हिणी घाटाला केवळ हवामानाच्या नकाशावरच नव्हे तर भारताच्या निसर्गवैभवातही अनोखी ओळख मिळवून दिली आहे.