सह्याद्रीत आठ वाघांचे स्थलांतर; महाराष्ट्राच्या पश्चिम भागाला नवा जीवदान
-
कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला अखेर नवे जीवनदान मिळाले आहे. पर्यावरण मंत्रालयाने ताडोबा व पेन्च येथून ३ नर आणि ५ मादी वाघिणींच्या स्थलांतराला मंजुरी दिली आहे.
सध्या सह्याद्रीत केवळ तीन नर वाघ आहेत. संख्या आणि आनुवंशिक विविधता वाढवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. डिसेंबरमध्ये दोन वाघिणी प्रथम आणल्या जाणार असून त्यांचे निरीक्षणानंतर जंगलात सोडले जाईल. पुढील टप्प्यात उर्वरित वाघ येतील.
स्थलांतर प्रक्रियेत प्राण्यांची सुरक्षा आणि वैद्यकीय काळजी घेण्याचे कठोर नियम घालण्यात आले आहेत. अपघात झाल्यास परवानगी रद्द होऊ शकते.
२०१० मध्ये चंदोली राष्ट्रीय उद्यान व कोयना अभयारण्य एकत्र करून तयार झालेला सह्याद्री प्रकल्प कोल्हापूर, सातारा, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यांत पसरलेला आहे. तो राधानगरी, अंबोली, भिमगड, महादेई (गोवा) आणि काली व्याघ्र प्रकल्पाशी जोडलेला असल्याने वाघांसाठी महत्त्वाचा मार्ग ठरतो.