https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/
सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक .
भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती करणे आणि या नयनरम्य निसर्गातील स्वर्गसुःख अनुभवने म्हणजे एक पर्वणीच.या दिवसात तर सगळीकडेच पर
-
https://www.facebook.com/share/v/1BxSH7R377/
सांडवली धबधबा - एक अपुर्ण जंगल ट्रेक .
भर पावसाळ्यात सातारा जिल्ह्याच्या दऱ्याखोऱ्यात स्वच्छंदपणे भटकंती करणे आणि या नयनरम्य निसर्गातील स्वर्गसुःख अनुभवने म्हणजे एक पर्वणीच.या दिवसात तर सगळीकडेच पर्यटकांची तुंबळ गर्दी बघायला मिळते . सहाजीकच निसर्गाने दिलेली साद कोणाला ऐकू येत नाही . तुम्हालाही ऐकू येत असेलच ना ? खास करुन रविवार हा वार भटकंतीसाठी लोकप्रिय आहे कारण बहुतेक जणांना रविवारी सुट्टी असतेच . परंतू आमचा कार्यक्रम मात्र बरोबर त्या ऊलट असतो . म्हणजे आमचा सलून व्यावसाय रविवारी फुल्ल . त्यामुळे आम्ही इतर दिवशी निसर्गाच्या हाकेला साद देत असतो . कित्येक दिवसांपासून काही नवनवीन ठिकाणं डोक्यात घर करून बसलीत . त्यापैकी एक म्हणजे सांडवली चा धबधबा होय . खुप जणांकडून ऐकलं होतं या ट्रेकमध्ये अद्भुत निसर्गाचे दर्शन होते म्हणून . आणि कोणताही निसर्गवेडा एखादा ट्रेक पहील्यांदाच करणार असतो त्यावेळी त्याची ऊत्सुकता शिगेला ताणली गेलेली असते . तस तर पावसाळ्यात आपल्या रांगड्या महाराष्ट्रात सगळीकडेच निसर्गाची ऊधळण होत असते . पण आपली जन्मभुमी , कर्मभूमी असलेल्या साताऱ्याच्या मातीतील इथल्या हिरव्या गर्द झाडीतून भटकताना आपले निसर्गाशी असलेले अतुट नाते आणखीनच घट्ट होत जाते .मी तर बऱ्याच वेळा निसर्गाचे रूपडे बघून भाऊक होऊन जातो . अशा वेळेस माझ्या मनात निसर्गा- प्रतीची असलेली इज्जत आणखीनच वाढते . गेल्या आठवड्यातच सांडवली धबधब्याकडे भटकंतीला जायचे म्हणून माहिती काढली . तर या ट्रेकमध्ये एका विशिष्ठ जागेवर पाण्यातून नदी ओलांडावी लागते . आणि त्याच दिवशी पाऊस जास्त झाल्याने नदीला पाणी वाढल्याचे कळाले आणी तीकडे जायचे पुढे ढकलावे लागले .नंतर 15 ऑगस्ट ला सोमवारी जायचे पक्के झाले . माझा मित्र सचिन घोरपडे याने त्याचा मित्र जो सांडवली ट्रेकचे आयोजन करणार होता त्यांच्या ग्रुप मध्ये आम्हाला जॉईन व्हायचे ठरविले . पण आम्ही आमच्या गाडीतून म्हणजेच थार मधून जाण्यासाठी स्टेडियमच्या बाहेर ' त्या ' ग्रुप ची वाट बघत बसलो . त्या मित्राने कित्येकदा फोन करून सुद्धा एकदाही फोन उचलला नाही . शेवटी कंटाळून आम्ही सर्वांनी आपणच स्वतःची गाडी घेऊन सांडवलीला निघण्याचे ठरविले . पुढे जाऊन नाक्यावरुन राज पुरोहीत ची जिलेबी आणि फरसाण घेऊन निघणार तोच 'त्या ' मित्राचा फोन आला की मला म्हणजे त्याला काल रात्री कुत्रे चावले त्यामुळे मी येऊ शकत नाही . परंतू मी तुम्हाला गाईड गाठून देतो . असे आश्वासन त्याने दिले आणि पुर्ण केले . त्याप्रमाणे समर्थ मंदीरहून स्वप्निल हा गाईड आमच्या सोबत सामील झाला .आम्ही एकून सातजन परळी खोऱ्याकडे निघालो . त्यामध्ये मी आणि माझे मित्र सचिन , चेतन , दिपक , बंटी आणि हो माझा लाडका पुतणेश श्रेयश, आम्हाला गाईड करणारा स्वप्निल . खरं तर कुठलाही गाईड हा नंतर मित्रच बनत असतो . आठ दिवस अगोदर सांडवली धबधब्याचे व्हिडिओज सारखे सारखे बघीतल्यामुळे माझे मन तर जणू काही गाडी पोहचायच्या आगोदर धबधब्याच्या पायथ्याला पोहचले होते . शेवटी आमची थार गाडी खाचखळग्यातून चिखलातून आम्हाला अलगद नेऊन गाडीतळावर जाऊन विसावली होती . तत्पूर्वी उरमोडी धरणाचे नयनरम्य फोटोही कॅमेरॅत विसावले होते . गाडीतून उतरून ट्रेक ला सुरुवात करताच पाचव्या मिनिटाला सर्वांच्या बुटांच्या नाकातोंडात पाणी शिरलं होतं . तिथल्या जमीनीवरील पायवाटा देखील पाण्याच्या प्रवाहाने झाकून टाकल्या होत्या . त्यामुळे चालताना जास्तीत जास्त पाण्यातूनच जावे लागत होते . त्याचवेळी रिमझीम पावसाच्या सरी स्वागत करत होत्या . तिथलं वातावरण एवढं सुंदर होत की तासापुर्वी शहरात होतो हे विसरूनच गेलो होतो आम्ही . दहा टक्के पांढरा रंग तो फेसाळलेल्या नदीच्या पाण्याचा , तीस टक्के पोपटी रंग गवताचा आणि भातशेतीचा उरलेला साठ टक्के गडद हिरवा रंग हा जंगलातील वृक्षवल्लींचा असा तो नजारा डोळयांचा बाहूपटलांवर तरळत होता . इकडं पाहू की तीकडं पाहू माझातर असा गोंधळ होत होता . कारण कितीही भारी लेन्सच्या कॅमेरॅपेक्षा आपल्या डोळ्याच्या लेन्सेसमधून डोक्याच्या मेमरी चीप मध्ये साठणाऱ्या आठवणी आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत रहात असतात . नदिकडे पहिला कटाक्ष टाकताच क्षणी असे वाटत होते की धो धो पावसाने नदिच्या पाण्याचा प्रचंड प्रवाह गर्वाने छाती काढून तीचा पसारा केवढा आहे हे दाखवत होता . प्रचंड पाण्याचा आवाज हा तुम्ही शहरातील नेहमीच्या कर्कश गोंगाटापासून लांब इथे जंगलात आहात याची जणू काही तंबीच देत होता . इथे फक्त जंगलाचा म्हणजेच निसर्गाचाच कायदा चालतो हेही बजावत होता . ही सर्व भावना जेव्हा तुम्ही निसर्गातील प्रत्येक कणाकणाशी सच्चा दिलाने एकरूप झाला तरच ती कळते असा माझा अनुभव आहे . आम्ही पुढे जात असताना अजस्त्र वृक्षांनी वेलींनी जंगलाची वेगळ्या रूपातच ओळख करुन दिली होती . एका झाडाशी मनोमन बोलोस्तोपर्यंत शेजार चे झाड त्याची वेगळीच कहानी सांगायचे . त्यांच्या शेजारी जमीनीवर वेगवेगळ्या प्राण्यांच्या पडलेल्या विष्टा बघून रात्रीच्या काळोखात जंगल प्राण्यांच्या रूपाने जणू काही पहाराच देत असेल असे वाटत होते . फेसाळणाऱ्या नदिच्या काठाने आम्ही स्वच्छ जंगलातून पुढे जात होतो . स्वच्छ याकरीता की आम्ही चालताना देखील पायवाटेवरून नडगीभर पाण्यातून चालावे लागत होते . असा माझातरी पहिलाच अनुभव होता . ती एक खास जागा शोधण्यासाठी आमची धरपड चालू होती , जीथून त्या नदीचा प्रवाह कमरे एवढया पाण्यातून पार करत पलीकडच्या काठाला जायचे होते आणि त्याच वाटेने अजस्त्र सांडवलीच्या धबधब्याकडे जाता येणार होते . तेवढा एकच पर्याय होता .मी सहजच कमरे एवढ्या पाण्यातून म्हणालो पण त्या दिवशी त्या परिसरात धो धो पाऊस झाल्यामुळे नदिचे पात्र कोणत्याही साधणांशिवाय पार करने एक अशक्य काम होते . ते पाणी कमरे एवढे नसून गटांगळ्या खाण्याइतके जरूर होते .कृपया सगळालेख इथं बसत नाही त्यामुळे वरिललिंक वर जाऊन बघा
-
छान लिहिला आहे
-
अफलातून वर्णन 👏🙌