NodeBB
    • Categories
    • Recent
    • Tags
    • Popular
    • Users
    • Groups
    • Login

    राजगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; दहा ते पंधरा पर्यटक जखमी!

    Scheduled Pinned Locked Moved Announcements
    1 Posts 1 Posters 179 Views
    Loading More Posts
    • Oldest to Newest
    • Newest to Oldest
    • Most Votes
    Reply
    • Reply as topic
    Log in to reply
    This topic has been deleted. Only users with topic management privileges can see it.
    • A Away
      admin
      last edited by admin

      वेल्हे (पुणे) – सह्याद्रीतील प्रसिद्ध किल्ले राजगडावर गेल्या तीन दिवसांपासून मधमाशांच्या हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. विशेषतः सुवेळा माचीवरील मेढा परिसरात पर्यटकांवर अचानक हल्ले होत असून, दहा ते पंधरा पर्यटक किरकोळ जखमी आहेत. गडाच्या तटबंदी, बुरुज आणि कपारीत मोठ्या प्रमाणात मधमाशांची पोळे असल्याचे आढळले आहे. सध्या रानफुलांचा हंगाम असल्याने मधमाशांची हालचाल वाढली आहे. त्या अन्न आणि परागकण गोळा करण्यासाठी परिसरात मोठ्या संख्येने फिरत आहेत

      पर्यटकांनी पुढील काळात काही सावधगिरीचे उपाय पाळावेत:
      मधमाशांची पोळे दिसल्यास त्या भागाजवळ जाणं टाळा.
      स्प्रे, परफ्युम, किंवा गोड पदार्थ बाळगू नयेत.
      मोठ्या आवाजात ओरडणे किंवा दगडफेक टाळा.
      गडावर रंगीत कपडे किंवा सुगंधी क्रीम वापरू नका.
      मधमाशा त्रास देऊ लागल्यास शांत राहून झाकून घ्या आणि धावू नका.

      गडावर जाणाऱ्या सर्व ट्रेकर्स आणि पर्यटकांना प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. राजगडाच्या सह्याद्रीसदृश सौंदर्याचा आनंद घ्या — पण निसर्गाचा आदर ठेवा!

      ESakal
      https://www.esakal.com/pune/consecutive-honey-bee-attacks-on-tourists-at-rajgad-fort-for-three-days-10-15-injured-velhe-pjp78#goog_rewarded

      1 Reply Last reply Reply Quote 0
      • First post
        Last post
      Powered by NodeBB | Contributors