NodeBB
    • Categories
    • Recent
    • Tags
    • Popular
    • Users
    • Groups
    • Login

    एकोले परिसरातील लोटस पॉईंट येथे फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

    Scheduled Pinned Locked Moved Announcements
    1 Posts 1 Posters 341 Views
    Loading More Posts
    • Oldest to Newest
    • Newest to Oldest
    • Most Votes
    Reply
    • Reply as topic
    Log in to reply
    This topic has been deleted. Only users with topic management privileges can see it.
    • adminA Away
      admin
      last edited by

      मुळशी तालुक्यातील एकोले परिसरातील लोटस पॉईंट येथे फिरायला गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आयुष हिरायडे (रा. काजूर, मूळ गाव – गोंदिया) हा आपल्या मित्रांसह परिसरात फिरण्यासाठी आला होता.
      मिळालेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे साडेअकराच्या सुमारास पाण्याची खोली अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, शिवदुर्ग मित्र लोणावळा, मुळशी आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच वन्यजीव रक्षक मावळ यांच्या मदतीने शोधमोहीम राबविण्यात आली.
      रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील तपासासाठी आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठविण्यात आला असून स्थानिक पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
      या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.!

      1 Reply Last reply Reply Quote 0
      • First post
        Last post
      Powered by NodeBB | Contributors