मारुंजी ते तिकोणा:
सकाळी सातच्या घडीला काळूबाई मंदिरापासून तिकोणाचा ट्रेक सुरू केला. सोबत भूषण, किरण आणि नारायण असे न थकनारे आणि जोमाचे सवंगडी सोबत होते. एक दिवसीय ट्रेक, त्यामुळे ओझेही तसे फारसे काही न्हवते. शिदा आणि पाणी घेऊन आम्ही मारुंजी टेकडीवरील मा
-
मारुंजी ते तिकोणा:
सकाळी सातच्या घडीला काळूबाई मंदिरापासून तिकोणाचा ट्रेक सुरू केला. सोबत भूषण, किरण आणि नारायण असे न थकनारे आणि जोमाचे सवंगडी सोबत होते. एक दिवसीय ट्रेक, त्यामुळे ओझेही तसे फारसे काही न्हवते. शिदा आणि पाणी घेऊन आम्ही मारुंजी टेकडीवरील मारुतिरायाच्या चरणी माथा टेकला. काही बैठे खेळ पाहिले आणि पुढे हिंजवडी टेकडी चढली जिथून पुण्याचा बराचसा पसारा नजरेस आला. मारुंजीचा डोंगर म्हणजे खरेच हिंजेवाडीच्या कुशित लपलेला आणि न उलघडलेला एक कोडचं!! कारण या वाटेत बरेचसे बैठेखेळ कोरलेले होते. जे या ठिकाणचे महत्व दर्शवतात. यातील बरेचसे बैठेखेळ हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पण याबद्दल जास्त कोणाला माहिती नाही.
पाच एक किलोमीटरवरच पुढे कासारसाई देवीच ठाणे लागले. आता पाऊस ही बरसायला लागला होता. डोंगरावर सर्वत्र गवताचे साम्राज्य होते. गुरांनी पडलेल्या वाटा सोडल्या तर कुठे घुसायचं तर दहा वेळ विचार करावा लागेल असे गवत. मधे मधे एकदम उच टेकड्या आणि लगेच तीव्र उतार, खडे टप्पे यामुळे हा ट्रेक नक्कीच मध्यम ते अवघड स्वरूपात मोडतो. दगडावर पाय ठेवला की सटकायचा. वारा एवढा की गवतावर समुद्राच्या लाटांसारख्या वलया बनत होत्या. आम्ही जवळपास साडे चारच्या सुमारास मांडवीच्या पायथ्याला पोहचलो आणि शेवटी या वाटेत कुणीतरी भेटलं ते म्हणजे एक आज्जी, पंधरा वीस गुरे आणि त्यांचा शेरू (कुत्रा) आम्हाला पाहून सर्वांनी जणू घेरावच घातला. शेरू भूकंतोय आणि जनावरेही रिंगण करून पुढे सरकत होती. आम्ही आपला आजी आजी करतोय!!
इथून पुढचा प्रवास मात्र जाम दमवणारा पण तितकाच रोमांचकारी होता. डोक्याच्या वर वाढलेली कारवी त्यामुळे वाटा पूर्णपणे नामशेष झालेल्या. दोन स्टिक हातात घेऊन खिंड लढवल्यासारखे कारवी तोडत, धोपटत आणि तुडवत जवळपास एक किलोमीटर अंतर हे वाट बनवून पार केले. आता समोर तिकोणा दिसत होता त्यामुळे जोशाने पावले उचलत होती. तरी अंधार पडलाच. खिंड ही विलक्षण कोरीव तासल्यासारखी होती जवळ जवळ ती आम्ही अंधारात उतरली आणि तिकोणच्या पायथ्याला येऊन ट्रेकची सांगता केली.
🖋️- Pramod Pudale