भटकंती मार्ग :
दिवस पहिला: बोराट्याची नाळ (मोहरी ते पाने गाव)
दिवस दुसरा : सिंगापूर नाळ (दापोली ते मोहरी)
परवा शनिवारी सकाळी रायलिंग पठारावर जायला बाईकला किक मारली. डावीकडे सूर्य तर उजवीकडे चंद्र, मस्त राइड करत करतच सिंहगड, राजगड आणी तोरणाच्या भव्य नजाऱ्यांचा आनंद घेत मोहरी गाव गाठली. रायलिंग पठारचा परिसर म्हणजे म्हणजे नाळींचा खजानाच मग त्यात बोराटीची नाळ, सिंगापूर नाळ, फाडतरीची नाळ, आग्या नाळी किंवा भिकनाळ असो.(माझ्या माहितीतल्या नाळी)
न लागणारे साहित्य गावातच ठेवून आणी थोडीशी माहिती विचारून पठाराच्या दिशेने वाट धरली. बोराट्याच्या नाळीने खाली उतरून लिंगाणाच्या बेसला पोहचलो. लिंगाण्या वर एक ग्रुप चढत होता. ते कसे चढताहेत काय ट्रिक्स वापरत आहेत कुतूहलणे बघत बघत थोडा विसावा घेतला. लिंगाणा किती उच आहे याची प्रचिती खाली बेस ला गेल्यावर आली.
बेस पासूनच उजवीकडे लिंगाणा मचीवर जायला नाळीमधून वाट आहे. तिकडे मार्किंग नसल्या मुळे घेऊन गेलेल्या खडूचा वापर केला. पावसाळ्यात नाळेत दरड कोरळून बरीच झाडे, दगड वाहून गेलेले. त्यामुळे तो मार्ग बराच बिकट होता. लिंगाणा मचीवर बरेच राण माजले होते. कडसर लिंगाणा वरील लोकांचे पुनर्वसन खाली पाणे गावाजवळ झाल्याने संपूर्ण वस्ती निर्मनुष्य होती. घरे दिसत होती पण सगळ्या घरांना कुलपे.
सुकलेल्या गवातच्या वाटेवर सोनेरी रंगाची सूर्याची किरणे, मागे दिसणारा श्रीमान रायगड पाहत पाहत पाने गावात उतरलो. मोहरी गावा ते पाने गाव साधारण 7 किमीचाच ट्रेक करायला आम्हाला जवळपास 5-6 तास लागले. आता पाणे मधेच संद्याकाळचे 6 वाजलेले दुसऱ्या दिवशी सिंगापूर नाळ करायची होती म्हणून परत दापोलीच्या दिशेने ट्रेक सुरु केला. दापोली हे सिंगापूर नाळेचे दुसरे टोक(कोकणातील गाव) नदीच्या डाव्या बाजूने चालत चालत दापोलीच्या अलीकडे अर्धा किलोमीटर वर टेन्ट लावला. छोट्या स्टो वर जेवण बनवला आणी मस्त चांदण्या रात्रीत बाहेर बसून जेवण केला.
परत सकाळ उठून गावात नास्ता, पाणी करुन् आवरले आणी गावातील विहारीचा पाणी 2-3 बॉटल मध्ये भरले या पाण्याला तोड नाही. सिंगापूर नाळेची वाट धरून पाईपीट पुन्हा सुरु झाली. ही नाळ बोराट्याच्या नळेपेक्षा बारिचशी सोपी अशी नाळ. पण यावेळी संपूर्ण चढ चढायचा होता. नाळ चढूण गेल्यावर वरून दिसणारा नजरा जबादास्त होता. बरीच पायपीट झाली पण या नळीच्या ट्रेक ची मज्या काय औरच.
नवख्यासाठी अनुभवाच्या काही टिप्स.
- नाळ वाटते तेवढी सोपी नाहीये.
- आपण कोणावर ओझे बनून रिस्क घेऊन जाऊ नका आधी आपल्या शरीराची क्षमता लक्ष्यात घ्या.
- कमीत कमी 2-3 लिटर पाणी सोबत ठेवा.
3 जेवढे कमी ओझे घेऊन जाता येईल तेवढे जा. - तिथे फक्त रिलायन्स कार्ड ला रेंज आहे.
- कॅश सोबत ठेवा.
- गावातील लोकांशी संवाद करून माहिती घेऊनच ट्रेक सुरु करा.
- वेल्हे पासून पुढे मोहरी पर्यंत कुठेही गॅरेज, पंचर दुकान नाही आहे सोबर पंचर किट, टूल्कीट ठेवा.