कोथळीगड - पदरगड दोन्ही करायचे आहेत --तर पहिला कोणता करायचा
म्हणजे पाठी पुढे होणार नाही
-
कोथळीगड - पदरगड दोन्ही करायचे आहेत --तर पहिला कोणता करायचा
म्हणजे पाठी पुढे होणार नाही -
कर्जत वरून गेला तर पहिल्यांदा कोथळीगड लागतो.. मग पदरगड... एक दिवसांमध्ये दोन्ही गड होणार नाहीत
-
पहिला कोथळीगड करा आणि दुसऱ्या दिवशी तुंगी गडावरून पदराकडे रस्ता जातो. पायवाट थोडी शोधावी लागते पण तुंगी गावात विचारून घ्या एक जुनी वाट पदराकडे जाते असे ऐकले आहे पण आधी पूर्ण चौकशी करा दुसऱ्या दिवशी तुंगी ते पदरगड करू शकता. पण तुंगी गावात चौकशी करा. मागे आम्ही चौकशी केली तेव्हा गावातून माहिती मिळाली होती त्या वाटेबद्दल पण वेळेअभावी आम्हाला जाता आले नव्हते