राजगड ते तोरणा संजीवनी माचीच्या अळू दरवाजा पासून चालू होऊन तोरण्याच्या बुधला माचीवर संपतो.
तोरणा वरून दोन रस्त्याने तुम्ही जाऊ शकता एक म्हणजे नेहमीचा वेल्हे मार्गे उतराई दुसरा म्हणजे थोडासा घसारिचा बुधला माचीपासून थोडे पुढे आलात तर तोरणा समोर ठेऊन डावीकडे वाळंजाई दरवाज्याने देवीच्या ठाण्याकडे रस्ता जातो त्या रस्त्याने खाली भट्टी गावात उतरू शकता. पण हा रस्ता घसरिचा आहे आणि पायवाट पण risky आहे कारण कोणी जास्त वापरत नाही. भट्टी तून सिंगापूर किंवा मोहरी मधे जायला लागेल. तिथून सिंगापूरच्या नाळेने रायगड जिल्ह्यात दापोली गावाला जाता येते . सिंगापूरची नाळ थोडी सोपी आहे उतरन्यासाठी.
दुसरी नाळ बोरट्याची नाळ मोहरी गाव पुढे रायलिंग पठार त्याच्या डाव्या बाजूने खाली उतरते लिंगाणा च्या खिंडीत. ही वाट थोडी अवघड आहे. खाली पाने गाव लागेल.