मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्लॅन आहे माझा तरी सर्व मी सोय करून निघणार आहेत अजून काय माहिती असेल तर सांगा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ची क
-
मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्लॅन आहे माझा तरी सर्व मी सोय करून निघणार आहेत अजून काय माहिती असेल तर सांगा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ची कशी काय सुविधा आहे कोणाला काही माहित असेल तर सांगा
-
वाघंबे गावातून ट्रेक सुरु करा. 1 तासात खिंडी मधे पोहचून डावीकडे सालोटा आहे आणि उजवीकडे साल्हेर. खिंडीतून दोन्ही सालोटा 1 तास आणि साल्हेर दीड तास ट्रेक आहे. कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. ट्रेक मध्यम ते अवघड श्रेणी चा आहे. नवख्या ट्रेकर नी एकटे जाऊ नये. मुक्कामाला श्री उद्धव महाराज मठ आहे. तिकडे सगळी सोय होऊ शकते. फक्त जेवणाची सोय आपापली करावी. थंडी खुप आहे. त्यानुसार तयारीने जावे. आणखी काही माहिती हवी असल्यात संपर्क करा. 7709173737.
-
साल्हेर जर पहिला करणार असाल तर मी suggest करेन साल्हेरवाडी पासून ट्रेक चालू करा. कारण की हा राजमार्ग आहे तसेच जाताना तुम्हाला गडाचे बरेच दरवाजे पहायला मिळतात, तसेच गडाच्या पायथ्याशी तुम्हाला सरदार सूर्याजी काकडे यांची समाधी पण बघायला मिळेल या दरवाजाने जाण्याचा फायदा म्हणजे तुमची पूर्ण गडफेरी होते. वाघांबे गावातून येणाऱ्या पायवाट या दोन गडांच्या मधल्या खिंडीमध्ये पोहोचता उजव्या हाताला तुम्हाला साल्हेरला जावं लागतं साल्हेर फिरून परत तुम्हाला त्याच खिंडीत उतरावे लागते त्यामुळे साल्हेरवाडीतून साल्हेर पहिला करा त्यानंतर परत सालोटेकडे जाण्यासाठी तुम्हाला परत खिंडीत उतरावा लागेल तिथून सालोटा असे दोन्ही गड होतील