परांडा चा भुईकोट म्हणजे स्थापत्य आणि युद्ध शास्त्राचा अद्भुत नमुना म्हणावा लागेल, कोटावरील बुरुजांची आणि बुरुजांवरील तोफांची रचना खरोखर अद्भुत आहे, पण सध्याची त्याची स्थिती पाहून थोडे वाईट वाटले खंदकाच्या भोवती आणि आत मधे झालेलं अतिक्रमण आणि कोटाच्या आत मूर्तींची झालेली दुरावस्था पाहून वाईट वाटले. कोटावरील कमान विहीर पण बघण्यासारखी आहे. स्थानिक पातळीवर जर या कोटाचे नीट संवर्धन झाले तर खरोखर लोक पैसे देऊन पहायला येतील नक्की.