साल्हेर जर पहिला करणार असाल तर मी suggest करेन साल्हेरवाडी पासून ट्रेक चालू करा. कारण की हा राजमार्ग आहे तसेच जाताना तुम्हाला गडाचे बरेच दरवाजे पहायला मिळतात, तसेच गडाच्या पायथ्याशी तुम्हाला सरदार सूर्याजी काकडे यांची समाधी पण बघायला मिळेल या दरवाजाने जाण्याचा फायदा म्हणजे तुमची पूर्ण गडफेरी होते. वाघांबे गावातून येणाऱ्या पायवाट या दोन गडांच्या मधल्या खिंडीमध्ये पोहोचता उजव्या हाताला तुम्हाला साल्हेरला जावं लागतं साल्हेर फिरून परत तुम्हाला त्याच खिंडीत उतरावे लागते त्यामुळे साल्हेरवाडीतून साल्हेर पहिला करा त्यानंतर परत सालोटेकडे जाण्यासाठी तुम्हाला परत खिंडीत उतरावा लागेल तिथून सालोटा असे दोन्ही गड होतील